स्वरसंधी -
जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.
उदा.
1. ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा
2. सूर्यास्त = सूर्य + अस्त
3. सज्जन = सत् + जन
4. चिदानंद = चित् + आनंद
संधीचे प्रकार:
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.
स्वर संधी -
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.
दिर्घत्व संधी -
1. अ + अ = आ
2. आ + आ = आ
3. आ + अ = आ
4. इ + ई = ई
5. ई + ई = ई
6. इ + इ = ई
7. उ + ऊ = ऊ
8. उ + उ = ऊ
नियम -
(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.
उदा.
ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा
गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश
उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश
चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय
महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी
देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी
(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.
उदा.
एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य
सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव
मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य
प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य
जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ
गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ
(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.
उदा.
प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ
इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी
अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम
प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक
मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर
पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा
(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.
उदा.
ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन
गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन
गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर
नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक
व्यंजन संधी :
एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.
उदा.
1.सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)
2. चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)
नियम -
(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.
उदा.
विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल
वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती
क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा
(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात.
0 टिप्पण्या