नाम
खऱ्या किंवा काल्पनिक गोष्टीची अथवा त्यांच्या गुणांची नवे दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात
उदाहरणार्थ;:-गोपाळ,मुलगा,आंबा,फुल इत्यादी.
lakshvedhi |
नामाचे प्रकार तीन आहेत:-
- सामान्य नाम
- विशेषनाम
- भाववाचक नाम
एकाच जातीच्या अनेक वस्तुंना लागू होणाऱ्या नामास "सामान्यनाम" असे म्हणतात
उदाहरणार्थ:-माणूस,प्राणी,गावात,झाड,गाई,पर्वत,नदी,घर इत्यादी.
विशेषनाम
ज्या नामाने एकाच जातीच्या अनेक वास्तूपैकी एकाच विशिष्ट वस्तूंचा भोध होतो, अशा नामास "विशेषनाम" असे म्हणतात
उदाहरणार्थ:-गोपाळ,काली कपिला गाई,सहयाद्री.
भाववाचक नाम
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यामधील गुणांचा, धर्माचा व भावाचा भोध होतो त्या नामास "भाववाचक नाम" असे म्हणतात
उदाहरणार्थ : शौर्य, वात्सल्य,स्वामित्त्व,दास्य इत्यादी .
सामान्यनामांना व विशेषण ई,य त्वं,पण,ता,गिरी,कि,वा,आई असे प्रत्यय लागूनही भाववाचकांनां तयार होतात
उदाहरणार्थ:-माणुसकी, देवत्व,कौशल्य,ओलावा,गारवा,क्रूरता,गुलामगिरी
0 टिप्पण्या