अनेक शब्दाच्या सुसंगत रचनेतून अर्थपूर्ण वाक्य तयार होते। उभा अनेक अर्थपूर्ण वाक्यांनी भाषा समृद्ध होते
भाषेचा अभ्यास म्हणजे सर्वप्रथम शब्दाचा अभ्यास, किंबहुना "शब्दविचार" करणे आवश्यक ठरते।
नाम
खऱ्या किंवा काल्पित गोष्टींची अथवा त्यांच्या गुणांची नावे दर्शवणाऱ्या विकारी शब्धाला 'नाम' असे म्हणतात।
उदाहरणार्थ:- गोपाळ, मुलगा, आंबा , फुल, गाई इत्यादी।
सर्वनाम
नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दास "सर्वनाम" असे म्हणतात
उदाहरणार्थ:-तो,तू,मी,हा,जो,जे
विशेषण
जे शब्ध नामबद्धल विशेष ,माहिती देतात व त्यांची व्याप्ती मर्यादित करतात, त्यांना विशेषण असे म्हणतात,
उदाहरणार्थ:-हुशार,मूर्ख,भित्रा,कला इत्यादी.
क्रियापद
वाक्यातील क्रिया स्पष्ट करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्धास क्रियापद असे म्हणतात,
उदाहरणार्थ:-आहे,होतच, गेला,आला,येतो.
क्रियाविशेषण
क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दास "क्रियाविशेषण" असे म्हणतात
उदाहरणार्थ:- तेथ। येथे,आज,काल, नंतर,आगोदर .
शब्दयोगी अव्यय
नामना किंवा सर्वनामानं जोडून येणाऱ्या आणि वाक्यातील इतर शब्दहांशी संभंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्धास शब्दयोगी अव्यव असे म्हणता.
उदाहरणार्थ:-वडाखाली,घरासमोर,शाळेपरीयंत,रस्त्यावर,कामासाठी या जोधशबदांमध्ये नामांना किंवा सर्वनामांना जोडून आलेले खाली,समोर,पर्यंत,वर,साठी हे संबध शब्द.
अभयान्वयी अव्यय
दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
उदाहरणार्थ:-आणि,व,किंवा,परंतु,म्हणून.
केवलप्रयोगी अव्यय
जे शब्ध आपल्या मनातील आनंद,दुःख,आश्चर्य या सारख्या भावना वा अन्य विचार व्यक्त करतात त्यांना "केवलप्रयॊगी अव्यय" असे म्हणतात
उदाहरणार्थ:- वाहवा,शाब्बास,अरेरे,ओये,अरे,बापरे इत्या.
0 टिप्पण्या