विशेषणाचे खालील पैकी तीन प्रकार पडतात
१ गुणविशेषन
२ संख्याविशेषण
३ सर्वनामिक विशेषण
गुणविशेषन
ज्या विशेषणे नामाचा एखादा गुण दर्शविला जातो व नामाची व्याप्ती मर्यादित केली जाते त्या विशेषणास 'गुणविशेषण' असे म्हणतात
उदाहरणार्थ:- चांगला मुलगा,श्रीमंत व्यक्ती,धीट मुलगी,शूर सैनिक.
संख्याविशेषण
नामाची संख्या दर्शवणाऱ्या विशेषणास 'संख्याविशेषण' असे म्हणतात उदाहरणार्थ:-चार मुले,खूप माणसे,दहा रुपय,
संख्याविशेषनाचे असे पाच प्रकार पडतात
'गणनावाचक' जसे:-दहा पन्नास हजार,
क्रमवाचक जसे:-पहिला,दुसरा,तिसरा किंवा प्रथम ,द्वितीय
आवृत्तीवाचक:-जसे:-दुपट,चोवपट,दसपट.
'पृथकत्ववाचक जसे:- दोन-दोन,पाच-पाच.
अनिश्चित संख्यावाचक जसे:- अल्प,एकंदरीत,खूप, बरेच.
सर्वनामिक विशेषण
जेव्हा सर्वनामांचा उपयोगे विशेषणाप्रमाणे होतो तेव्हा त्यांना 'सर्वनामिक विशेषण असे म्हणतात
उदाहरणार्थ तो मुलगा, ती मुलगी,त्याची पोरगी,कोण मनुष्य ?
या शिवाय
नामसाधित विशेषण जसे :-फळ-विक्रेता ,कापड-बाजार,साखर-भात.
धातुसाहित विशेषण जसे:- रडका मुलगा,चकती गाडी, खेळता पैसा.
अव्ययसाधित विशेषण जसे:-पुढील मैदान, मागील बगीचा, वरचा मजला इत्यादी.
0 टिप्पण्या