महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :-
महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग
1. कोकण किनारपट्टी
2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट
3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी
1. कोकण किनारपट्टी :-
स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
विस्तार: उत्तरेस - दमानगंगा नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.
2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :-
स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :-
स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
लांबी-रुंदी: पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.
ऊंची: 450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.
महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्यांनी व्यापले आहे.
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी
महाराष्ट्रची कोकण किनारपट्टी :-
स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
विस्तार : उत्तरेस - दमानगंगा नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .
उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.
कोकणातील प्राकृतिक रचना :-
कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
किनार्य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.
कींनार्यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
उतार पूर्व-पश्चिम दिशेस 'मंद' स्वरूपाचा आहे.
या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली 'भुरुपे' आढळतात.
· उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.
कोकणचे उपविभाग :-
· 1.उत्तर कोकण - ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.
· हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.
· ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.
· लोकसंख्येची घनता अधिक.
· नागरी लोकसंख्या जास्त.
· दक्षिण कोकण - रत्नागिरी, सिंधुदुर्ग
· हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.
· ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.
· लोकसंख्येची घनता कमी.
· पारंपरिक व्यवसाय.
· खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.
समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात.
1. खलाटी(पश्चिम कोकण) : समुद्र किनार्याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे 'खलाटी' होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.
या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.
2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश.
म्हणजेच 'वलाटी' होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.
कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे
1. खाडी :
भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.
ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे
मुंबई उपनगर : मालाड, माहीम
मुंबई : माहीम
रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट
रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग
सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल.
2. पुळनी :
समुद्र किनार्याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्यावर तयार होणार्या वाळूच्या पट्टयाना 'पुळन' असे म्हणतात.
मुंबई उपनगर : जिहू बीच
मुंबई शहर
दादर, गिरगाव
रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर
सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा
रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन.
3. वाळूचे दांडे :
सागरी लाटांमुळे उथळ कींनार्यावर 'वाळूचे दांडे' तयार होतात.
खरदांडा(रायगड).
4. बेटे :
मुंबई : मुंबई बेट
रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)
अलिबाग : खांदेरी, उंदेरी
सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)
मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव.
5. बंदरे :
महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.
मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),
रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,
सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी.
6. खनिजे :
बॉक्साईट = ठाणे,
म्यंगेणीज = सिंधदुर्ग,
क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व
जिप्सम = रत्नागिरी.
7. नद्या :
ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,
मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री
दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.
जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्यास समांतर. कारण, 'डोंगरांच्या रांगा'.
8. किल्ले :
जिल्हे डोंगरी किल्ले व सागरी किल्ले
ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा
रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा
रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग
सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग
भारतगड, पधगड सजैकोत.
0 टिप्पण्या